अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्वरित राजीनामा द्यावा - खारघर मध्ये भाजप कडून निदर्शने
खारघर: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय अटक केली. अटक झालेल्या नेत्याने त्वरित राजीनामा द्यावा यासाठी खारघर मधील भाजप कार्यकर्त्यांनी भाजप जनसंपर्क येथील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करताना नवाब मलिक आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप खारघर मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता, दाऊदशी हितसंबंध,आर्थिक हितसंबंध अशा सर्व गोष्टी तपासल्यावरच अंमलबजावणी संचालनालयने मलिक यांना अटक केलेली आहे. अटक झालेल्या नवाब मलिक यांनी नैतिकतेच्या आधारावर लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी केली या याप्रसंगी मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती सभापती संजना समीर कदम, नगरसेवक अभिमन्युसेठ पाटिल, निलेश बाविस्कर, रामजीभाइ बेरा, शत्रुघ्न काकडे,सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ति नवघरे, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, समीर कदम, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटिल, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा संध्या शारबीद्रे, जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्षा मोना आडवाणी, उपाध्यक्षा बिना गोगरी, संजय घरत, गुरूनाथ गायकर, दिलिप केणी, सचिन वासकर, जेष्ठ नागरिक अध्यक्ष नवनीत मारू, मुकेश गर्ग, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतिक्षा कदम, सिमा खडसे, आशा शेंडगे, विपुल चोटलिया, पप्पू खामकर, अशोक पवार, शैलेन्द्र त्रिपाठी, रमेश महेन्द्रू, अंजुबेन पटेल, स्मिता आचार्य, दुर्गेश, मिनाक्षी अंथवाल इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.