संभाजी नगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय 'फ्लोअर जिमण्यास्टिक' स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात शर्वरी हिला 'गोल्ड मेडल'
नवी मुंबई : संभाजी नगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय 'फ्लोअर जिमण्यास्टिक' स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात कु शर्वरी पाटोळे हिने 'गोल्ड मेडल' मिळवुन तीने आपल्या शाळेचं नाव उज्वल केले आहे शर्वरी हिचे समाजातील सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.
शर्वरी ही नवी मुंबईतील रहिवासी शिवाजी पाटोळे यांची नात व सौ. शीतल हिची मुलगी आहे. शर्वरी हिने केआरए अकॅडमी तर्फे संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय "फ्लोअर जिमण्यास्टिक" स्पर्धेत १४ वर्ष गटात : गोल्ड मेडल' मिळवून आपल्या शाळेचे नांव रोशन केले.. शर्वरी ही उलवे येथील रॅडक्लिफ स्कूल, मध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत आहे तिला शाळेतून जागतिक कीर्तीचे प्रशिक्षक अविनाश मोरे सर व ज्योती शिंदे म्यॅडम हे प्रशिक्षक म्हणून लाभले. शर्वरी हिचे सर्व माध्यमातून कौतुक केले जात आहे. तिचे राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर नांव रोशन करण्याचे स्वप्न आहे.