बँकांच्या व्यवहारात मराठीचा वापर करावा; ‘मनसे'चे नवी मुंबईतील बँकांना पत्र

नवी मुंबई : शिवतीर्थ येथील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व बँकांना खडसावून सांगत त्यांची सर्व कामे मराठीत चालायला हवी. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने तसे परिपत्रक काढून सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. परंतु, बऱ्याच बँक या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून मराठी भाषेला दुय्यम स्थान देत आहेत. मराठी महाराष्ट्राची राजभाषा असून मराठीचा वापर प्रत्येक व्यवहार, बँकांच्या कागदपत्र, अर्ज, खाते पुस्तक, सूचना फलक, जाहिराती, धनादेश, बँकेचा मोबाईल संदेश यामध्ये करणे अपेक्षित आहे. याचे पालन व्हावे यासाठी ‘मनसे'चे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जुईनगर मधील विविध शासकीय, खाजगी बँकांना पत्र दिले. बँकांच्या सर्व व्यवहारात, कागदपत्रात, अर्ज, खाते पुस्तक, सूचना फलक, जाहिराती, धनादेश, बँकेचा मोबाईल संदेश यामध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच येत्या ७ दिवसांत जर अपेक्षित बदल दिसला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. 

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या ४ बँकांमध्ये जाऊन ‘मनसे'ने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तेथे मराठीचा वापर होतो की नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ‘आरबीआय'च्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवण्याचे काम स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या दोन्ही सरकारी बँकांनी केल्याचे दिसून आले. या दोन्ही बँकांना मनसे पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचा दम दिला आहे. काही प्रमाणात मराठीचा वापर करणाऱ्या आयसीआयसीआय बँकेचे कौतुक करत १०० टक्के व्यवहारात मराठीचा अंतर्भाव करावा, अशी विनंती करण्यात आली.

दरम्यान, ४ एप्रिल पासून नवी मुंबईमध्ये ‘मनसे'चे पदाधिकारी विविध भागात जाऊन अशा प्रकारचे पत्र बँकांना देणार आहेत. ‘मनसे'च्या शिष्टमंडळात महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू, दिपाली ढवूळ, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, योगेश शेटे, निखील गावडे, महिला सेना विभाग अध्यक्ष विद्या इनामदार, संगीता वंजारी, उपविभाग अध्यक्ष संतोष टेकवडे, सुमित जाधव, शाखा अध्यक्ष मयुर कारंडे, संकेत बोडके, संजय कदम, संदीप कांबळे, उपशाखा अध्यक्ष संतोष मोटे तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिडकोनिर्मित कॉलनीमधील गरजेपोटीच्या बांधकामाबाबत निर्णयासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक - ना. गणेश नाईक