‘रामबाग'वर ‘सिडको'ची वक्रदृष्टी

पनवेल : न्हावे खाडी परिसरात पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उभारण्यात आलेली निसर्गरम्य आणि देखणी रामबाग आता ‘सिडको'च्या कारवाईच्या छायेत सापडली आहे. काही लोकांच्या व्यवतीगत स्वार्थासाठी रामबाग उध्वस्त करण्याचा घाट ‘सिडको'कडून घातला जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या कारवाईला तीव्र विरोध करण्याचा आणि वेळ पडल्यास जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

चिखलात जसे कमळ फुलावे त्याप्रमाणे न्हावे खाडीमध्ये पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुंदर आणि निसर्गरम्य बाग उभारली गेली आहे. मात्र, काही लोकांच्या वैयवतीक कारणासाठी रामबागेवर तोडक कारवाई करण्याचे संकेत मिळाल्याने या कारवाईला प्रखर विरोध करण्याचा ठाम निर्णय न्हावे आणि गव्हाण विभागातील ग्रामस्थांनी घेतला असून तसा पुकार त्यांनी दिला आहे.  लोकांच्या हितासाठी उभारलेली रामबाग अबाधित रहावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेकडो ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन तोडक कारवाई थांबवावी, अशी विनंती वजा मागणी केली आहे. यावेळी ग्रामस्थांची आ. प्रशांत ठाकूर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आमदार ठाकूर यांनी ग्रामस्थ जो निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.

विमानतळ, इमारती आणि इतर प्रकल्प बांधण्यासाठी सीआरझेडचे नियम सिडको पायदळी तुडवते. मात्र, या ठिकाणी नियमाचा फार्स करुन विशेषतः व्यवतीगत राग काढण्याचा न्यायालयात आणि सिडकोत जाण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे ‘रामबाग'ला ‘सिडको'कडून नोटीस मिळाली. बागेवर कारवाई करण्यासाठी काहींची धडपड सुरु आहे. मात्र, रामबाग परिसराचे वैभव आहे आणि त्यावर कुठलीही कारवाई होऊ नये यासाठी आम्ही ग्रामस्थ एकत्र आलो आहोत. रामबाग आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम नाही तर बगीचा आणि शौचालय आहे, असे न्हावे ग्रामपंचायतचे माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे यांनी सांगितले.

‘रामबाग'चे संरक्षण आणि विकास ‘सिडको'ने किंवा ग्रामपंचायतीने करण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी यापूर्वीच ‘सिडको'कडे केली आहे, असेही म्हात्रे यांनी नमूद केले.  

सदर बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, ‘भाजपा'चे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, ‘न्हावे'चे सरपंच विजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, ‘गव्हाण'चे माजी उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच सागर ठाकूर यांच्यासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिखलाने भरलेल्या खाडी परिसरात जसे कमळ फुलते, तशीच रामबाग फुलवली गेली आहे. स्थानिक नागरिकांसाठी सदर परिसर फक्त एक बाग नसून निसर्गाशी जोडणारा प्राणवायू केंद्र आहे. मात्र, काही व्यक्तींच्या वैयवतीक कारणांसाठी ‘रामबाग'वर सिडकोकडून तोडक कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत, जे ग्रामस्थांना कोणत्याही परिस्थितीत मान्य नाहीत. न्हावे आणि गव्हाण विभागातील ग्रामस्थांनी एकत्र येत या निर्णयाला विरोध दर्शवला असून भविष्यात मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही दिला आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्र रेल्वे लवकरच फाटक मुक्त -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस