तेरणा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी राबवला बीजगोळे बनवण्याचा उपक्रम

नवी मुंबई : तेरणा विद्यालय, नेरूळ ह्या शिक्षण संकुलातील पहिली ते सातवी इयत्तेतील १७७ विद्यार्थांना बीजगोळे बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मदतीने २८००० बीजगोळे (सीडबॉल) तयार करून पर्यावरणाविषयी मार्गदर्शन प्रश्न फाउंडेशन मार्फत  देण्यात आले. प्रश्न फाउंडेशन ही संस्था सुरू करणारे विद्यार्थी हे तेरणा विद्यालय ह्या शाळेचे माजी विद्यार्थी असून आपलं दैनंदिन दिवसातील काम सांभाळून ही तरुण मंडळी हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असं म्हणत गेली २ वर्षे प्रश्न फाउंडेशन मार्फत नवी मुंबई, मुंबई, रायगड, पालघर, सातारा, सांगली अशा विविध जिल्ह्यात ३००० पेक्षा जास्त झाडे लावून त्याचं संवर्धन करण्याचं काम यशस्वीरित्या करत असताना प्रश्न फाउंडेशनमार्फत (सिडबॉल) बीजगोळे बनवण्याचा आणि विविध जिल्ह्यातील डोंगराळ भागात ते बीजगोळे टाकून वनराई नैसर्गिकरित्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रश्न फाउंडेशन मार्फत राबवल्या जाणाऱ्या ह्या उपक्रमाबाबत शाळेच्या मुख्यधापिका सौ.मधुवंती काटवडे आणि शिक्षक संतोष खांडगे यांनी सांगितले की प्रश्न फाउंडेशन मार्फत  राबवला जाणारा हा उपक्रम पर्यावरण पोषक असून विद्यार्थ्यांना मातीशी जोडणारा हा उपक्रम आम्ही दरवर्षी शाळेत राबवणार आहोत. या उपक्रमाच्या आयोजन आणि नियोजनाची धुरा सांभाळणारे संस्थेचे अध्यक्ष सूरज उत्तम बिडगर ह्यांनी तेरणा विद्यालय, नेरूळ नवी मुंबई शिक्षण संकुलाचे आभार मानले. येत्या काळात विविध शिक्षण संस्था तसेच सामाजिक संस्थानी ह्या बीजगोळे बनवण्याच्या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्ते दुरुस्ती कामांसाठी १५ मे पर्यंत डेडलाईन