उल्हास नदीवरील पुलाला झाडा-झुडपांचा विळखा  

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ग्रामीण अ-प्रभाग क्षेत्राला जोडणाऱ्या एकमेव उल्हास नदीवरील पुलाच्या खांबाच्या कमानी लगत झाडे-झुडपे फोफवत असल्याने पुलाची दुरवस्था होत आहे. या संदर्भात ‘शिवसेना उबाठा'चे नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

एन.आर.सी. कंपनीने १९४२ साली उल्हास नदीवर साधरण १६० मीटर लांब, २५मीटर ऊंच आणि ७ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या पुलाची स्टोन आर्च मशेनरी ब्रीज प्रकारची दगडी बांधणी केल्याची माहिती समजत़े. कल्याण शहरास आणि मोहने वडवली अटाळी, आंबिवली, गाळेगाव, ऊबर्णी, मोहिली, बल्याणी, टिटवाळा, आदि ग्रामीण परिसर दळवण-वळणाच्या दुष्टीकोनातून जोडला गेलेला पूुा आहे. ‘केडीएमसी'ने सन-२००५च्या सुमारास लाखो रुपये खर्चून पुलाची डागडुजी केली होती. सद्यस्थितीत पुलावरुन गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचे सिमेंट क्राँक्रीट छोटेखानी खाबांचे कठडे काही ठिकाणी तुटलेले आहेत.

उल्हास नदीवरील पुलाच्या खांबाच्या कमानी लगत वृक्षवल्ली फोफावत आहे. त्यामुळे तडा जाऊन पुलास संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. ‘शिवसेना'चे माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी  यांनी उल्हास नदीवरील या पुलाच्या दुरवस्थेबाबत आणि पुलाच्या खांबाच्या कमानी लगत फोफावत असलेल्या झाडे-झुडपे बाबत संभाव्य दुर्घटना घडण्याअगोदर डागडुजी करण्यात यावी. तसेच प्रस्तावित उल्हास नदीवरील नवीन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन साकडे घालणार आहे.

या पुलावरील जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईन जेएनयु अंतर्गत टाकलेल्या असून त्या पाईपलाईनच्या बरोबरीने पुलाच्या खालील बाजुने शिपट केली असती तर पुलावर जागा जास्त मिळाली असती. त्यामुळे पुलाचा कठडा आणि जलवाहिनीच्या गॅपमध्ये झुडपे वाढली नसती, असे जाणकारांचे मत आहे.

उल्हास नदी आणि बारावे खाडी यांच्या क्षेत्रातील सदरचा शेवटच्या टप्यातील पुल असून उल्हास खोरेतून पावसाळ्यात येणारे पाणलोट क्षेत्र पाहता पुलाच्या धोक्याची पातळी पाण्याची यंत्रणा देखील या पुलावर २००६ च्या पुर परिस्थितीनंतर अद्यापही देखील कार्यान्वित केली नसल्याचे चित्र दिसते. या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट ३ वर्षापूर्वी केले असून, नवीन प्रस्तावित पुलाचे प्राकलन ६० कोटींचे बनविले असल्याचे अधिकारी सुत्रांनी सांगितले. तसेच पुलावरील झाडे-झुडपे काढण्यासंदर्भातत प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार आहे.                
पुलाच्या स्ट्रक्चरला पडलेल्या झाडे-झुडपाच्या विळख्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. संभाव्य पुल दुर्घटना बघता धोका होण्यापूर्वी संदर्भित पुलाचे स्ट्रक्चरल आँडीट करणे गरजेचे आहे. तसेच नवीन प्रस्तावित पुलाच्या कामाच्या प्रस्तावाला प्रशासनाने गती दिली पाहिजे.  
-दयाशंकर शेट्टी, माजी नगरसेवक-केडीएमसी.                  

पावसाळ्यापूर्वी झाडा-झुडपांची छाटणी केली होती. पावसाळ्यामुळे झाडे-झुडपे वाढली असतील तर सद्या छाटणी करुन पावसाळ्यानंतर केमिकलच्या सहाय्याने नष्ट करुन पडलेल्या तडाची देखील डागडुजी करण्यात येईल. तसेच नवीन प्रस्तावित पुलाच्या कामाच्या निधीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.
-अनिता परदेशी, शहर अभियंता-केडीएमसी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

६ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन