भाजपा तर्फे सीवूड्स-करावे विभागात ‘घर घर संपर्क अभियान'
नवी मुंबई : महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा सीवूड्स-करावे मंडल तर्फे स्व.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्ताने ‘घर घर संपर्क अभियान' उपक्रमाचा शुभारंभ २१जून रोजी सीवूड्स-करावेनगर मधील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. वर्षाताई भोसले, मंडल अध्यक्ष सुधीर जाधव, कुणाल महाडिक, भास्कर यमगर, माजी मंडल अध्यक्ष जयवंत तांडेल, राजेश राय, मंगलताई घरत, विकास पाटील, बापू दडस, धवल माने, श्रवण कुमार त्रिवेदी, देवेंद्र पॅथी, माधवसिंग राजपूत, सुहास वेखंडे तसेच ‘घर घर संपर्क अभियान'च्या संयोजक सौ. अश्विनी दत्ता घंगाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
भाजपा सीवूड्स-करावे मंडल तर्फे २३ जून रोजी सीवूड्स-करावे विभागात ‘घर घर संपर्क अभियान' राबविण्याची सुरुवात करण्यात आली असून, या अभियानाची सांगता येत्या २३ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात येणार आहे
‘घर घर संपर्क अभियान' मध्ये भाजपा कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनतेच्या अडचणी ऐकून त्यावर चर्चा करणार आहेत. भविष्यातील विकास कामांंबाबत नागरिकांचे मत जाणून घेणार आहेत. याशिवाय भाजपा सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासह नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जनतेच्या सूचना संकलित करणार आहेत, अशी माहिती ‘भारतीय जनता युवा मोर्चा'चे माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी दिली.
‘घर घर संपर्क अभियान' निमित्ताने सीवूड्स-करावे विभागातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास संपादन करुन त्यांच्या सहभागातून पारदर्शक आणि जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थेची उभारणी होण्यासाठी मजबूत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी नागरिकांची मदत आणि सहभाग होईल, हेच उद्दिष्ट ‘घर घर संपर्क अभियान'मागे आहे. - दत्ता घंगाळे, माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष - भारतीय जनता युवा मोर्चा.