महापालिका निवडणूक, संघटनात्मक बांधणी संदर्भात ‘काँग्रेस'ची बैठक संपन्न 

उल्हासनगर : ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी'चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने आगामी महापालिका निवडणूक आणि संघटनात्मक बांधणी संदर्भात आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार उल्हासनगर विभागाकरिता ‘प्रदेश काँग्रेस'चे सचिव आणि वक्ता गोपाल तिवारी यांची नेमणूक करण्यात आली असून तिवारी यांनी पक्षाची आढावा बैठक नुकतीच घेतली.

गोपाल तिवारी यांनी उल्हासनगर शहर अध्यक्ष रोहित साळवे आणि पदाधिकाऱ्यांसोबत उल्हासनगर शहराचा १० एप्रिल रोजी दौरा केला. त्यानंतर उल्हासनगर-२ मधील नेहरु भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली.

सर्वप्रथम तिवारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रात आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले. बेरोजगारी आणि महागाई पासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याकरिता भाजप सरकार धार्मिक द्वेश पसरवित असल्याची आरोप तिवारी यांनी यावेळी केला. काँग्रेस पक्ष देशात १० वेळा निवडून आले असून २ वेळा निवडून आलेले मोदी सरकार आज ‘काँग्रेस'ला देश कसा चालवायचा या संदर्भात सल्ला देत आहे. म्हणजे २ वेळा जिंकलेला पेहेलवान, १० वेळा जिंकलेल्या पेहेलवानाला पेहलवाणी शिकवीत आहे, असा टोला गोपाल तिवार यांनी मोदी सरकारवर मारला.

राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी २१०० रुपये असे वचन लाडक्या बहिणींना देऊन त्यांची फसवणूक केली आहे. पण, कर्नाटकातील काँग्रेस सरकार कशा पध्दतीने दिलेला शब्द पाळत आहे, ते बघावे असा सल्लाही तिवारी यांनी दिला. तसेच प्रशासकीय राजवटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात उल्हासनगर महपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून संपूर्ण शहरात नागरी सुविधांचा बोजवरा उडाला आहे. आज फक्त उल्हासनगर काँग्रेसच प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून नागरी प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलने करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उल्हासनगर मध्ये काँग्रेस प्रमुख पर्याय म्हणून जनते सामोरे जाईल, असेही तिवारी म्हणाले.

सदर बैठकीनंतर शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्या उपस्थितीत ‘उल्हासनगर काँग्रेस'च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, सुनील बेहराणी, कुलदीप ऐलसिंहानी, प्रदेश प्रतिनिधी वज्झरुद्दीन खान, शंकर आहुजा, अशेराम टाक, अजीझ खान, प्रो गेम्नांनी, फमीदा सय्यद, नियाज खान, राजेश फक्के, बापू पगारे, रोहित ओव्हल, दीपक सोनवणे, वामदेव भोयर, निलेश जाधव, पुष्पलता सिंघ, आबा साठे, अन्सार शेख, उषा गिरी, विद्या शर्मा, देव आठवले, मनोहर मनुजा, पुरुषोत्तम मढवी, ईश्वर जागियासी, सॅम्युअल मावची आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठाणे मध्ये आयोजित ना. गणेश नाईक यांच्या जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद