सत्कर्म आश्रमात दोन पुस्तकांचे प्रकाशन
बदलापूर : सत्कर्म आश्रम बदलापूर आणि प्रेरणा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका सचिव सौ.चित्रा बाविस्कर यांच्या डोक्यावर चांदोबा आणि गंगा मराठी तसेच असे आमुची मायबोली या ब्रेल लिपीतील दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.
सदर कार्यक्रमास प्रेरणा फौंडेशनचे पदाधिकारी सौ.प्रेरणा कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, सत्कर्म आश्रमाचे पदाधिकारी मकरंद वढवेकर आणि पेशणे तसेच कला, क्रिडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील राज्यभरातुन आलेले विविध मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. सदर ब्रेल लिपीतील पुस्तकांचा प्रकाशन सोहळा प्रेरणा फौंडेशन आणि सत्कर्म आश्रमाचे पदाधिकारी तसेच एक्स कमांडींग ऑफीसर-होमगार्ड डी.एस.नारकर, व्हीजिलन्स ऑफीसर पायरसी सेल रामजीत गुप्ता, ज्येष्ठ गायक व आकाशवाणी मुंबई केंद्राचे सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ फडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.