रक्तदान शिबीर द्वारे राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ‘जागतिक रक्तदान दिन'चे औचित्य साधत सामाजिक भावनेतून मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मनसे, नवी मुंबई 'तर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन रक्तदान चळवळीतील विनायक अपराज यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरास नवी मुंबईतील सामाजिक संघटनांनी, महिला बचत गटांनी, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील सभासदांनी मोठ्या संख्येने भेट देऊन ‘मनसेने राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
या रक्तदान शिबिरात १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये नवी मुंबईतील ‘मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक, विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या, नवी मुंबई महापालिका मूषक नियंत्रण- एनएमएमटी कर्मचारी यांचा समावेश आहे. यावेळी केमिस्ट ब्लड बँक, सानपाडा यांचे रक्तदान शिबिराचे प्रशस्तीपत्रक ‘मनसेे'कडून स्विकारण्यात आले.
ज्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले, ते रक्तदान चळवळीतील विनायक अपराज यांनी बोलताना सांगितले की, एका रक्तदात्याच्या रक्तदानाने आपल्याला ५ ते ७ रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात. त्यामुळे ‘मनसेे'ने राबविलेल्या या रक्तदान शिबिरात १२० रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे आम्ही जवळपास ५०० ते ७०० रुग्णांचे भविष्यात प्राण वाचवू शकतो याचे आम्हांला मनापासून समाधान वाटत असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.
शिबिरातील रवत गरजू बाळाला तत्काळ उपलब्ध...
या रक्तदान शिबिरादरम्यान ‘मनसेच्या पदाधिकाऱ्याला अडीच वर्षाच्या लहान बाळाला एबी पॉझिटिव्ह या दुर्मिळ रक्ताची अत्यंत गरज असल्याबाबत बाळाच्या नातेवाईकांचा फोन आला. त्यानंतर तात्काळ केमिस्ट ब्लड बँकेच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी बाळाच्या नातेवाईकांसोबत फोनवरुन बोलणे करून दिले. त्यांनी लगेचच एबी पॉझिटिव्ह या गटाच्या रक्ताची पिशवी बाळाला उपलब्ध करून दिली. त्यामुळे अतिशय मोठ्या संकटातून बाळाला बाहेर काढल्याबद्दल ‘मनसेे'च्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या शिबिराप्रसंगी ‘मनसेे'चे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, निलेश बाणखेले, विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, दिनेश पाटील, नितीन लष्कर, मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, मनसे रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, मनसे रोजगार-स्वयं रोजगार सेना शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, मनसे महिला सेना उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, दीपाली ढऊळ, महिला सेना शहर सचिव यशोदा खेडसकर, विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, चंद्रकांत मंजुळकर, भूषण आगीवले, दत्ता कदम, नितीन नाईक, रोहन पाटील, विशाल चव्हाण, अक्षय भोसले, अनिकेत भोपी, उमेश गायकवाड, निखिल गावडे, भूषण कोळी, विशाल गाडगे तसेच इतर पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.