महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कर्मचाऱ्याची स्वेच्छा सेवानिवृत्ती अन् वारसाला तत्काळ नोकरी
पनवेल : पूर्वाश्रमीच्या पनवेल नगरपरिषद तसेच पनवेल महापालिका आस्थापनेवर सफाई कामगार या पदावर असलेल्या सुनीता पारचे यांची १० मार्च २०२५ रोजी स्वेच्छा सेवानिवृत्ती झाली. यानंतर तातडीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुनीता पारचे यांचा मुलगा विजय पारचे याला तातडीने नोकरी देण्याचा अर्ज विचारात घेण्यात आला. त्यानुसार २ एप्रिल रोजी आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते या वारसास नियुक्ती पत्र देण्यात आले.
पनवेल महापालिका प्रशासनाचा सर्वच कर्मचाऱ्यांप्रति दृष्टीकोन सदैव मदतीचा आणि सहानुभूतीचा राहिलेला आहे. प्रामुख्याने सफाई कर्मचाऱ्यांबाबत महापालिकेने कर्तव्य तत्परता दाखवत सदरचे पाऊल उचलले असल्याचे आयुक्त चितळे यांनी सांगितले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, डॉ. 1, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, स्वरुप खारगे, सहाय्यक संचालक केशव शिंदे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, श्रीराम पवार, डॉ. रुपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण तसेच इतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित हेाते.