खड्ड्यांच्या विरोधात ‘मनसे'चे आंदोलन
भाईंदर : मिरा-भाईंदर मधील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या कार्यकर्त्यांनी दहिसर चेक नाका येथे खड्ड्यांच्या विरोधात गाजर, केळी, लॉलीपॉप दाखवत आंदोलन केले.
दहिसर चेकनाका कडून काशिमीरा दिशेने जाणारा आणि येणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्या विरोधात आश्वासन देणाऱ्या प्रशासनाला जाग यावी, खड्ड्यांमुळे दुर्दैवी अपघात होऊ नयेत, चांगले रस्ते लवकरात लवकर बनविण्यात यावेत म्हणून गाजर, केळी, लॉलीपॉप दाखवून ‘मनसे'चे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली रॉबर्ट डिसोझा, प्रकाश शेलार, अभिनंद चव्हाण, सूर्या पवार, विजय भगत, भारत करचे, नितीन पाटील, रेमीज मचाडो, हरीश सिप्रे यांनी आंदोलन करीत आपला निषेध व्यक्त केला.