रस्त्यावर बसून श्री गणेशाची आरती; ‘मनसे'तर्फे प्रशासनाचा निषेध

डोंबिवली: पावसाळ्याच्या आधीच रस्त्यातील खड्डे बुजवणे आवश्यक असताना प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही. लाडक्या बहिणीला खड्ड्यात टाकेल, मानपाडा रोडवर खड्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याने ‘मनसे'ने २३ ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वकडील सर्वेश सभागृहासमोर प्रशासनाचा निषेध करत रस्त्यावर बसून टाळ-मृदूंगाच्या गजरात श्री गणेशाची आरती केली. यावेळी मनसैनिकांनी खड्ड्याभोवती हार घालून प्रशासनाचा निषेध केला.

मनसे कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, शहर अध्यक्षा मंदा पाटील, विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे, दीपक शिंदे, प्रेम पाटील, निषाद पाटील, प्रभाकर जाधव ,शहर संघटक स्मिता भणगे सुमेधा थत्ते,शहर सचिव रमा म्हात्रे, विभाग अध्यक्ष रवी गरुड, रतिकेश गवळी ,कदम भोईर, प्रदीप चौधरी, संजय चव्हाण, रक्षीत गायकर, महेंद्र कुंदे तसेच मोठ्या प्रमाणावर महिला सेना आणि महाराष्ट्र सैनिक वाहतूक सेना, विद्यार्थी सेना यांच्यासह इतर संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

येत्या २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरु होत असून गणपती बाप्पाची मूर्ती आणताना खड्ड्याची अडचण होणार आहे. रस्त्यावर बसून भक्त आणि नागरिकांकरिता ‘मनसे'ने रस्त्यावर बसून गणपतीची टाळ-मृदूंगाच्या गजरात आरती केली. प्रशासनाचे अधिकारी जोवर येत नाही तोवर आंदोलन सुरुच राहिल, असे मनसैनिक म्हणत होते.

यावेळी ‘एमएमआरडीए'चे अधिकारी देवरे आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आले असता मनसैनिकांनी त्यांना घेराव घातला. मात्र, देवरे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने मनसैनिक संतप्त झाले. त्यामुळे देवरे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच निघून गेले. त्यानंतर महापालिकेच्या सहायक आयुक्त हेमा मुंबरकर आणि अधिकारी आंदोलनस्थळी आल्या असता त्यांनाही मनसैनिकांनी घेराव घालत जाब विचारला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल