मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; ‘मध्य रेल्वे'ची सेवा विस्कळीत
ठाणे : टिटवाळा आणि आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी, लोकल २० मिनीटे उशिराने धावत होत्या. याचा फटका या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला असून, दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, नादुरुस्त इंजिन बाजुला केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
मालगाडीच्या इंजिनमधील बिघाडामुळे ‘मध्य रेल्वे'च्या सेवांवर थेट परिणाम झाला. कसारा ते कल्याण यांना जोडणाऱ्या मार्गावरील लोकल गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या. कल्याण-सीएसएमटी मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही सेवांवर याचा परिणाम झाला असून, प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. इंजिन दुरुस्तीचे काम केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झालीे. ट्रॅव्हल ॲप एम-इंडिकेटरनुसार, ठाणे दरम्यान धावणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.