विमानतळाला दिबांच्या नावासाठी पुन्हा एल्गार
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विनामतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी २४ जून या दिबांच्या स्मृतीदिनी पुन्हा एल्गार केला. यावेळी दि.बा.पाटील नामकरण समर्थनार्थ वाशीतून नवी मुंबई विमानतळ परिसरापर्यंत भव्य कार आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
म्हणून राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे.मात्र एकीकडे विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असताना नाकारण बाबत केंद्राकडून अजून हिरवा कंदील मिळाला नाही.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नामकरण देण्यासंदर्भात राज्य शासनाकडून २ वर्षापूर्वीच केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. परतं, केंद्र सरकारकडून विमानतळ नामकरणाबाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवाय ऑगस्ट-सप्टेंंबर महिन्यात नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्यासाठी विमानळ प्राधिकरण आणि केंद्र शासनाकडून हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरात लवकर दि. बा. पाटील यांचे देण्यात यावे म्हणून या मागणीचा पुनरुच्चार करतानाच याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त आणि भूमीपुत्रांकडून २४ जून रोजी दिबांच्या १२ व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रापासून करंजाडे येथे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पापर्यंत भव्य कार आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केले. यावेळी हजारो प्रकल्पग्रस्तांनी दुचाकी आणि चार चाकी वाहन घेऊन आपला सहभाग नोंदवला.