कचरा उचलणाऱ्या कामगाराला भटक्या कुत्र्याचा दंश

कल्याण : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संबंधित अनेक घटना वारंवार घडत असतात. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु तक्रारीनंतर संबंधित परिसरातील कुत्र्यांचे लसीकरण करुन त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला असून नुकत्याच कल्याण पश्चिम मधील शंकेश्वर प्रेसिडेन्सी टावरीपाडा येथे कचरा गाडीवरील कामगाराचा कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली.

जर घनकचरा विभागाचे कर्मचारी, कामगार असुरक्षित नसतील तर नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. भटवया कुत्र्यांविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिका कडून धडक मोहीम घेण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याअनुषंगाने संबंधित आरोग्य आणि घनकचरा विभागाला पत्र देण्यात येणार असून यावर त्वरित कारवाईसाठी आयुक्तांनी त्यांना आदेश द्यावेत. तसेच गृहसंकुलांनी आपल्या सोसायटीतील कचरा डब्बे शेड बनवून त्यामध्ये ठेवावेत; जेणेकरुन उघड्यावरील कचरा डब्यांमुळे कुत्र्यांचा वावर कमी होईल, अशी माहिती ‘स्फुर्ती फाऊंडेशन'चे अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डोंगराच्या कुशीत असलेल्या तलावास संजीवनी