जन सुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना तर्फे आंदोलन
नवी मुंबई : जनविरोधी, घटनाविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणारा जन सुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नवी मुंबई मधील पदाधिकारी आणि इतर संलग्न संघटना यांच्या वतीने १० सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना उपनेते वि्ील मोरे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, युवा सेना सहसचिव करण मढवी, उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, शिवसेना ग्राहक कक्षाचे लक्ष्मीकांत कोळपकर, संदीप शर्मा, आदिंसह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करीत जन सुरक्षा कायदा रद्द करण्याची आग्रही मागणी केली.