ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त नामांकितांचे कविसंमेलन
नवी मुंबई : ‘आपलं नवे शहर'चे स्तंभलेखक आणि सैरभैर, उजेडाच्या वाटा, खेळखंडोबा, पाऊस पाणी, पांढरे कावळे, चांगभलं अशा विविध पुस्तकांचे जनक असणारे नवी मुंबईकर साहित्यिक साहेबराव ठाणगे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ६ एप्रिल रोजी वाशी येथील ॲबट हॉटेलमध्ये जणू कवि संमेलनच भरले होते.
श्री. ठाणगे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे एकेकाळचे शिक्षक, माजी आमदार, चित्रपट निर्माते आणि नामांकित कवी सर्वश्री रामदास फुटाणे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर, प्रा. अशोक बागवे, प्रा.अरुण म्हात्रे, सतिश सोळांवुÀरकर यांनी उपस्थित राहुन कविता सादर केल्या व काव्यमय शुभेच्छा दिल्या. ठाणगे यांच्या कन्या व जावई यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करतानाच त्यांच्या गतजीवनावरील एक लघुपटही यावेळी पडद्यावर सादर केला. यावेळी नवी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रातील विविध नामांकित मंडळींनी उपस्थित राहुन ठाणगे यांचे अभिष्टचिंतन केले.