सोशल मीडियावर राहूल गांधींची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी

नवी मुंबई  : लोकसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्याबाबत सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी नेरूळ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे  निवेदनातून केली आहे.

खासदार राहूल गांधी हे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत केलेल्या विधान प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये दाखल खटल्यात, अखेर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना २४ जून रोजी जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी गेल्या १ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राहुल गांधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हिसी) हजर होते. राहूल गांधी यांना न्यायालयाने जामीन दिलेला असताना काही समाजकंठक अपप्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी, राहूल गांधींची जाणिवपूर्वक प्रतिमा मलीन करण्यासाठी सोशल मीडियावर या खटल्याबाबत न घडलेल्या घडामोडी मांडून समाजव्यवस्थेत वाद निर्माण करत आहेत. राहूल गांधी यांनी माफी मागितली अशा पोस्ट पसरवून राहूल गांधी यांच्याबाबत अपप्रचार करत असल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.

२५ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी दत्तात्रेय सोसायटी सेक्टर २ च्या ग्रुप वर ९२२५९०२९८० या मोबाईल नंबरने एक पोस्ट आली  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बद्दल त्यांचा फोटो आणि फोटो खाली  खाली माफीवर आणि माय लॉर्ड मुझे जमानत दीजिए मै अंदर नही  रह सकता मै  सावरकर नही हु,  नाशिक कोर्टात वीर सावरकर अपमान प्रकरणी राहुल गांधीने दूरध्वनी द्वारे माफी मागून १५ हजार रुपये भरून स्वतः ची जामीनावर सुटका करून घेतली माफी वीर राहुल गांधी .... अशी बदनामीची पोस्ट होती आणि ती पोस्ट विनायक कुलकर्णी यांच्या नावाने फेसबुकवर तयार करण्यात आली असे दिसते . 

मुळात राहुल गांधी यांनी नाशिक न्यायालयात अशी फोन वरून कोणती ही माफी मागितली नाही, ही अफवा पसरवण्या मागे हेतू काय? सामाजिक माध्यमावर खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे राजकीय द्वेष वाढवणे हाच यामागे हेतू असल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.

मुळातच जे न्यायालयात घडलेच नाहीत, ते घडल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमावर पसरवून राहूल गांधींची जनसामान्यांत प्रतिमा मलीन करणे, त्यांच्याविषयी समाजात गैरसमज निर्माण करणे, राजकीय वाद निर्माण करण्यास खतपाणी घालण्याचा हेतू यामागे असावा. आपण या समस्येचे गांभीर्य व समाजजीवनात वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून आपण चुकीची पोस्ट समाजमाध्यमावर पसरविणाऱ्या संबंधितांना अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे. सोबत नवी मुंबई काँग्रेस नेते संतोष शेट्टी, प्रवक्ते नासिर हुसेन, डॉ. मनोज उपाद्याय, विद्या भांडेकर, कृष्णा पुजारी, तारानाथ शेट्टी, शांताराम शट्टी, उत्तम पिसाळ, प्रल्हाद गायकवाड,व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खड्ड्यांच्या विरोधात ‘मनसे'चे आंदोलन