आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचनंतर डी.वाय.पाटील स्टेडिअम बाहेरील परिसरात तत्पर स्वच्छता;

नवी मुंबई : नेरूळ येथील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये रविवारी संपन्न झालेल्या लिजेन्ड्स ई आय क्लासिको या सामान्याला हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती असणार हे लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने  स्टेडियम बाहेरील रस्ते व परिसर स्वच्छतेचे पूर्वनियोजन केले होते.

त्यास अनुसरून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छता कार्यावर नियंत्रण ठेवले आणि नेरूळ विभागाचे स्वच्छता अधिकारी अरुण पाटील व स्वच्छता निरीक्षक मिलिंद आंबेकर, नवनाथ ठोंबरे, भूषण सुतार यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व पर्यवेक्षक, स्वच्छता दूत आणि कचरा वाहतूक पर्यवेक्षक, मॅनेजर व कचरा वाहतुकीचे सर्व स्वच्छता दूत यांच्या माध्यमातून डी वाय पाटील स्टेडियम बाहेरील रस्ते व परिसर स्वच्छ केला.

सामन्यानंतर रात्री 11 पासून पहाटे 3 वाजेपर्यंत ही विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 40 हून अधिक स्वच्छताकर्मी सहभागी होते. या परिसरात पडलेला 1.5 टन कचरा संकलित करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी लगेच वाहून नेण्यात आला. यामध्ये प्लास्टिक बॉटल्स तसेच सुक्या कच-याचे प्रमाण मोठे होते. एवढा मोठा इव्हेन्ट होऊनही पहाटेच मॉर्नींग वॉकला बाहेर पडणा-या नागरिकांनी परिसर स्वच्छ पाहून समाधान व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील कैद्यांना वाचनासाठी पुस्तकांची भेट