‘महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ'ची कार्यकारिणी जाहीर

मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ'ची २०२२-२०२५ या कालावधीतील त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शेगाव, जि. बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत वर्ष २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांची ‘महासंघ'च्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचप्रमाणे वित्त-लेखा विभागातील सहाय्यक संचालक समीर भाटकर यांची सरचिटणीस आणि मंत्रालयातील अवर सचिव संतोष ममदापुरे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह १२ उपाध्यक्ष, ३ महिला उपाध्यक्ष, १९ विभागीय सहचिटणीस आणि १९ महिला सहचिटणीसांचीही निवड झाली.

‘महासंघ'च्या सभेसाठी राज्यातील विविध खात्यांमधील अधिकारी संघटनांचे जवळपास २०० प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या प्रांरभी मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. माजी अध्यक्ष विनोद देसाई यांनी ‘महासंघ'च्या वाटचालीचा गोषवारा सादर केला, तर सरचिटणीस समीर भाटकर यांनी त्रैवार्षिक अहवालाचे वाचन केले. याशिवाय ‘ताणतणावाचे व्यवस्थापन' या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.

राजपत्रित अधिकारी महासंघ नवीन कार्यकारिणीः

अध्यक्ष- नितीन काळे, सरचिटणीस- समीर भाटकर, कोषाध्यक्ष- संतोष ममदापुरे, उपाध्यक्ष- मुंबई डॉ. श्रीकांत तोडकर, प्रदिप शर्मा, प्रदिप रणपिसे, कोकण- डॉ. संदिप माने, कोल्हापूर- संजय शिंदे, छत्रपती संभाजीनगर- शिरीष बनसोडे, नाशिक- रमेश शिसव, अमरावती- डॉ. संदिप इंगळे, नागपूर- डॉ. कमलकिशोर फुटाणे, लातूर- बाळासाहेब रावण शेलार, महिला उपाध्यक्ष- मुंबई- डॉ. सोनाली कदम, सहचिटणीस- मुंबई- ललीत खोब्रागडे, शेखर धोमकर, लक्ष्मण हुशेन्ना धुळेकर, कोकण- मनोज सानप, डॉ. राम मुंडे, छत्रपती संभाजीनगर- संजयकुमार भोसले, रविंद्र जोगदंड, नाशिक- आबासाहेब तांबे, चंद्रशेखर खंबाईत, अमरावती- कपिल नांदगांवकर, यशपाल गुडधे, नागपूर- योगेश्वर निंबुळकर, डॉ. शशिकांत मांडेकर,  लातूर- डॉ. राजेंद्र पवार, डॉ. प्रदीप आघाव, महिला सहचिटणीस- मुंबई- शिरीन लोखंडे, सिध्दी संकपाळ, कोल्हापूर- पुनम पाटील, सुनिता नेर्लीकर, छत्रपती संभाजीनगर- कुसुम चव्हाण, नाशिक- सरोज जगताप, सायली पाटील, अमरावती- सीमा झावरे, डॉ. क्रांती काटोले, नागपूर- सुवर्णा खंडेलवाल-जोशी, कुमुदिनी श्रीखंडे-हाडोळे, लातूर- डॉ. मृणाल जाधव, कल्याण केंद्र समन्वयक- आनंद कटके, सुदाम टाव्हरे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर प्रशासक राजवट