‘इमॅजिका पार्क'ने शालेय सहली कायमच्या बंद कराव्यात; अन्यथा आंदोलन

नवी मुंबई : २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने ‘नमुंमपा'च्या विविध शाळांमधील किमान १२०० विद्यार्थ्यांना घेवून खोपोली येथील इमॅजिका पार्क येथे सहल नेण्यात आली होती. यावेळी घणसोली शाळा क्र.७६ येथील हिंदी माध्यमातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आयुष सिंग (वय १४) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेला इमॅजिका पार्क व्यवस्थापन, नवी मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या संदर्भात न्याय मागण्यासाठी ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने ‘इमॅजिका पार्क'चे व्यवस्थापक शिवराज नायर यांची भेट घेतली.

शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक ठिकाणीच शाळा सहल नेऊ शकतात, असा शासन निर्णय असताना इमॅजिका पार्क या सहली आयोजित कशा करु शकतात? असा प्रश्न उपस्थित करुन नफेखोरीसाठी इमॅजिका पार्क लहान मुलांचा जीव धोक्यात का घालते? असा संतप्त सवालही मनसैनिकांनी उपस्थित केला. ‘इमॅजिका पार्क'मध्ये घडलेल्या घटनेचा अहवाल ‘मनसे'चे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मागवला असता इमॅजिका व्यवस्थापनाकडे असा अहवाल नसताना बघून राग व्यक्त केला.

यावेळी उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सुध्दा ‘इमॅजिका पार्क'वर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, असेही सांगण्यात आले. रखरखत्या उन्हात शालेय सहल काढणे अत्यंत चूक आहे. ‘इमॅजकिा पार्क'ने पुरेशी पाण्याची व्यवस्था न करणे तसेच जेवणासाठी चायनीज ठेवणे व्यवस्थापनाच्या मुर्खपणाचे लक्षण आहे. अशा अनेक चुका इमॅजिका पार्क व्यवस्थापनाने करुनही आयुष सिंग याच्या पालकांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. याबद्दल तीव्र नाराजी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच ‘इमॅजिका पार्क'ने यापुढे शासन निर्णयानुसार शालेय सहली आयोजित करु नये; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल, असा इशारा गजानन काळे यांनी यावेळी दिला.

‘मनसे'च्या शिष्टमंडळात गजानन काळे यांच्यासह रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्ना बनसोडे, मनविसे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महिला सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, महिला सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदिती सोनार, नवी मुंबई शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, मनसे कामगार सेना सरचिटणीस अभिषेक दर्गे, माथाडी सेना सरचिटणीस महेश सोगे, महिला सेना शहर सचिव यशोदा खेडसकर, नवी मुंबई विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, भूषण कोळी, अक्षय भोसले, नितीन नाईक, शाम ढमाले, रोहन पाटील, विशाल चव्हाण, सनप्रीत तुर्मेकर, रायगड जिल्हा विद्यार्थिनी अध्यक्ष रुचिता सोनार, मनविसे कर्जत तालुका अध्यक्ष प्रविण राणे, मनविसे खालापूर तालुका अध्यक्ष चेतन चोगले, भारती ताई कांबळे, अनिकेत पाटील, प्रतिक खेडकर, मधुर कोळी, प्रद्युमन हेगडे पस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने अदा करण्याची मागणी