युपीएससी परीक्षेत सी. डी. देशमुख संस्थेतील ४ विद्यार्थ्यांचे सुयश
ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) २०२४ साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत ठाणे महापालिका संचलित कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दिपाली महतो, अंकिता अनिल पाटील, वीर ऋषिकेश नागनाथ आणि सृष्टी सुरेश कुळये असे ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या ‘केंद्रीय लोकसेवा आयोग'च्या (युपीएससी) परीक्षेत दिपाली महतो (रँक एअर १०५), अंकिता अनिल पाटील (रँक एअर ३०३), वीर ऋषिकेश नागनाथ (रँक एअर ५५६) आणि सृष्टी सुरेश कुळये (रँक एअर ८३१) यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. सदर चारही विद्यार्थी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत नियमित प्रशिक्षण घेत होते. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या तसेच ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे ‘संस्था'चे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केले.
ठाणे महापालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था युपीएसएसी, एमपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणारी संस्था आहे. या संस्थेतून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून ते शासनाच्या सेवेत उच्चपदावर कार्यरत आहेत.
1. दिपाली महतो
2. अंकिता पाटील
3. वीर नागनाथ
4. सृष्टी कुळये