अग्निशामक शुभांगी घुले यांचा आयुक्त चितळे यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : जागतिक पोलीस-अग्निशमन स्पर्धा २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल पनवेल महापालिका अग्निशमन दलातील अग्निशामक शुभांगी घुले यांचा आयुक्त मंगेश चितळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पनवेल महापालिकेचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केल्याबद्दल आयुक्त चितळे यांनी घुले यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, स्वरुप खारगे, अभिषेक पराडकर, मुख्य लेखा-वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक नगररचनाकार केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरीक्षक संदिप खुरपे, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, प्रभाग अधिकारी, विभागप्रमुख, इतर अधिकारी उपस्थित होते.
अमेरिकेतील अल्बामा येथे नुकत्याच पार पडलेल्या २१ व्या जागतिक पोलीस-अग्निशमन स्पर्धा मध्ये महापालिकेच्या अग्निशाकम शुभांगी घुले यांनी अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव उज्वल केले आहे. तसेच फायर स्टेअर रेसमध्ये सांघिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले. याशिवाय फायर फायटिंग चॅलेंज स्पर्धेत चौथे तर फायर स्टेअर रेस वैयक्तिक स्पर्धेमध्ये पाचवे स्थान पटकाविले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.