नवी मुंबई महापालिका आंतरशालेय सांस्कृतिक चषक स्पर्धा जल्लोषात संपन्न

नवी मुंबई : सुनियोजित अशा आधुनिक शहराप्रमाणेच सांस्कृतिक शहर ही नवी मुंबईची ओळख दृढ करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून नव्या पिढीमध्ये कला व संस्कृती जोपासना करण्यासाठी शालेय पातळीवर विविध कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या सर्वच स्पर्धांना लाभलेला मोठ्या प्रमाणावरील सहभाग लक्षात घेता या उपक्रमामागील उद्दिष्ट साध्य होत असल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषकांतर्गत गायन, नृत्य, लघुनाटिका, पथनाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत अंगभूत कलागुण प्रदर्शित करून सर्वच स्पर्धा यशस्वी केल्या.

त्यांचा पारितोषिक वितरण सोहळा महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते, सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे व सुप्रसिद्ध अभिनेते नृत्य कलावंत नकुल घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झाला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या उपायुक्त गायन, नृत्य, लघुनाटिका, पथनाट्य आणि दिंडी अशा 5 स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना अनुक्रमे 100, 75 व 50 गुण प्रदान करण्यात आले होते. या पाचही स्पर्धांमिळून सर्वोत्तम गुण संपादन करणाऱ्या शाळांना नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक 2024 - 25 प्रदान करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. हा चषक सर्वाधिक 325 गुण संपादन करीत ऐरोली सेक्टर 8 ए येथील विबग्योर स्कूल यांनी पटकाविला.

गायन स्पर्धेमध्ये एकूण 54 शाळांनी सहभाग घेतला होता. पहिली ते पाचवीच्या लहान गटातून विबग्योर हायस्कूल ऐरोली यांची प्रथम क्रमांकासाठी तसेच नमुंमपा शाळा क्रमांक 42 घणसोली यांची द्वितीय क्रमांक व सरस्वती विद्यालय ऐरोली यांची तृतीय क्रमांकासाठी निवड केली. नमुंमपा शाळा क्रमांक 92 कुककशेत यांना विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले. अशाच प्रकारे सहावी ते दहावी या मोठ्या गटातील गायन स्पर्धेत मॉर्डन स्कूल वाशी हे प्रथम क्रमांक, श्रीराम विद्यालय ऐरोली हे द्वितीय क्रमांक आणि चार्टर्ड इंग्लिश सेकंडरी स्कूल ऐरोली हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

नृत्य स्पर्धेमध्ये एकूण 65 शाळांनी सहभाग घेतला होता. पहिली ते पाचवीच्या लहान गटात तेरणा विद्यालय प्रायमरी स्कूल नेरूळ हे प्रथम क्रमांक, प्राथमिक विद्यामंदिर बेलापूर हे द्वितीय क्रमांक आणि सरस्वती विद्यालय ऐरोली हे तृतीय क्रमांकाचे मानकरी म्हणून घोषित केले. त्याचप्रमाणे सहावी ते दहावीच्या मोठ्या गटात नमुंमपा शाळा क्रमांक 47 राबाडे हे प्रथम क्रमांकाचे, पीव्हीजी विद्याभवन इंग्लिश स्कूल नेरूळ हे द्वितीय क्रमांकाचे व विबग्योर हायस्कूल ऐरोली हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. नमुंमपा शाळा क्रमांक 15 शिरवणे यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

लघुनाटिका स्पर्धेमध्ये 28 शाळांनी सहभाग घेतला होता. विबग्योर हायस्कूल ऐरोली यांची प्रथम क्रमांक, विद्याभवन प्राथमिक मराठी शाळा नेरूळ यांची द्वितीय क्रमांक व नमुंमपा शाळा क्रमांक 46 गोठिवली यांची तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी निवड केली. नमुंमपा शाळा क्रमांक 91 विशेष पारितोषिकाची मानकरी ठरली. त्याचप्रमाणे श्रीराम विद्यालय ऐरोली व नमुंमपा शाळा क्रमांक 92 कुकशेत यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. विबग्योर हायस्कूलचा अल्हाद सुर्वे व विद्याभवन प्राथमिक मराठी शाळेची अनुष्का गोळे हे उत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि अभिनेत्री पारितोषिकाचे मानकरी ठरले.

पथनाट्य स्पर्धेमध्ये 23 शाळांनी सहभागी घेतला. त्यामधून अंतिम फेरीत नमुंमपा शाळा क्रमांक 92 कुकशेत यांची प्रथम पारितोषिक, विबग्योर हायस्कूल ऐरोली यांची द्वितीय पारितोषिक व श्रीराम विद्यालय ऐरोली यांची तृतीय पारितोषिकासाठी तसेच नमुंमपा शाळा क्रमांक 49 दिवा ऐरोली यांची विशेष पारितोषिकासाठी निवड केली. नमुंमपा शाळा क्रमांक 78 गौतमनगर रबाळे आणि नमुंमपा शाळा क्रमांक 71 इंदिरानगर तुर्भे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विमान प्रवासात फोर्टीस हॉस्पिटलच्या ३ महिला तज्ञांनी वाचविले प्रवाशाचे प्राण