भिवंडी शहरात १८ शाळा अनधिकृत
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका क्षेत्रातील शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या १८ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आह. या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पाल्यांचे प्रवेश घेवू नयेत, असे आवाहन भिवंडी महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित अनधिकृत शाळांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची नोटीस बजावली असून लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती भिवंडी महापालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेली आहे.
अनधिकृत शाळांची यादीः
शाळेचे नाव पत्ता
रॉयल इंग्रजी शाळा पटेल कंपाऊंड धामणकरनाका, भिवंडी
नोबेल इंग्रजी शाळा अवचितपाडा, भिवंडी
अलरजा उर्दू प्राथमिक शाळा गैबी नगर भिवंडी
मराठी प्राथमिक शाळा पाईप लाईन टेमघर भिवंडी
इंग्रजी प्राथमिक-माध्यमिक शाळा पाईप लाईन टेमघर भिवंडी
द लर्निंग प्राथमिक शाळा टेमघर पाडा भिवंडी
एकता इंग्रजी पब्लिक शाळा फातमा नगर नागांव भिवंडी
एकता उर्दू पब्लिक शाळा फातमा नगर नागांव भिवंडी
ए. आर. रेहमान उर्दू प्राथमिक शाळा फातमा नगर नागांव, भिवंडी
जवेेरिया उर्दू प्राथमिक शाळा गैबी नगर, भिवंडी
विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा नवी वस्ती, भिवंडी
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्राथ.शाळा रावजीनगर, पॉवर हॉऊसजवळ, भिवंडी
अलहिदाया पब्लिक प्राथमिक शाळा पटेल नगर बाळा कंपाऊंंड, भिवंडी
तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा जैतनपुरा, भिवंडी
इकरा इस्लामिक मकतब शाळा नदी नाका, भिवंडी
कैसर बेगम इंग्रजी शाळा नागांव, साहारा होटल जवळ, भिवंडी
फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा दिवान शाह दर्गा रोड, भिवंडी
गीतांजली माध्यमिक शाळा गायत्रीनगर वऱ्हाळेदवी, भिवंडी.