नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल
वाशी: मागील सव्वापाच वर्षांपापासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार २८ प्रभागातून १११ नगरसेवक-नगरसेविका महापालिकेत निवडून जाणार आहेत. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या १४ गावांचा देखील प्रभाग रचनेत समावेश करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या र्सावत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार २८ प्रभागात १११ नगरसेवक असणार आहेत. या प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविता येणार असून, नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणीसाठी संबंधितांना बोलावण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्ोण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना प्रारुप आराखडा तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोग आणि शासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभागांची रचना कशा प्रकारे करण्यात यावी यासंदर्भात परिपत्रक काढले होते. नवी मुंबई महापालिका ‘क' वर्गामध्ये मोडत असल्याने येथील प्रभागांची रचना महापालिका आयुक्तांकडून केली जात आहे. यापूर्वी २०२० मध्ये होणाऱ्या नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी डिसेंबर २०१९ मध्ये एकल पध्दतीने १११ नगरसेवक-नगरसेविकांसाठी आरक्षण काढण्यात आले होते. मात्र, २०२० मध्ये कोविड साथ आल्याने महापालिका मध्ये प्रशासकीय राजवट आली. त्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा त्रिसदस्यीय प्रभाग पाडून आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी ४१ प्रभागातून १२२ नगरसेवक निवडून जाणार होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आरक्षण प्रकरण न्यायालयात गेल्याने सदर निवडणूक होऊ शकली नाही. मात्र, आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्ोण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिका प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेनुसार २८ प्रभागात १११ नगरसेवक-नगरसेविका असणार आहेत. या प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे.
दरम्यान, मागील २०२२ मधील नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेत महापालिका प्रशासनाने घोळ घातल्याचा आरोप करत तत्कालीन आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनावर आगपाखड केली.होती. आता देखील शासन जोपर्यंत १४ गावांच्या विकासासाठी लागणारा निधी नवी मुंबई महापालिकेला देत नाही तोपर्यंत कल्याण तालुवयातील १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करु नयेत, अशी भूमिका राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांनी घ्ोतली होती. मात्र, ना. गणेश नाईक यांच्या विरोधाला डावलून कल्याण तालुवयातील १४ गावे नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे आता ना. गणेश नाईक काय भूमिका घ्ोतात याकडे नवी मुंबई मधील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.