वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता
नवी मुंबई : १ मार्च रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २८ आणि शाळा क्रमांक ३८ या शाळेत नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण संस्था रहाटोली बदलापूर, ठाणे यांच्यामार्फत २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेला प्रशिक्षण वर्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा सांगता १ मार्च रोजी करण्यात आली.
या प्रशिक्षणाकरिता पहिली ते बारावीपर्यंतचे एकूण ५०६ प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाला प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सर्व शाळांमधील शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्राथमिक प्रशिक्षण, शिक्षक वृद्धी प्रशिक्षण कोपरखैरणे येथे यशस्वीपणे पार पडले. या कार्यक्रमाकरिता नवी मुंबई केंद्राचे समन्वयक प्रशांत म्हात्रे प्रशिक्षण सहाय्यक समन्वयक श्रीमती शुभदा शिर्के, श्रीमती समृद्धी आंधळे आणि क्रमांक २८ चे म.न.पा मुख्याध्यापक श्री.टोळे तसेच म.न.पा शाळा क्रमांक ११० चे मुख्याध्यापक श्री खटके सर व सुलभकांमधे श्री सूर्यकांत जगदाळे, राज रॉय, अनिल सूर्यवंशी, हरिश्चंद्र हरड, पंढरीनाथ माळी, समाधान जाधव, दुर्गेश शिरसाट ,गेनू लोखंडे ,जयदीप वसावे, संदीप ठाकूर, अजय कुपेकर ,राजेश नाईकडे ,दयानंद उंडे ,संजय खाडे, श्रीमती शोभना चौधरी, श्रीमती वैशाली मराठे, किशोर ठोकळ, श्रीमती सोनाली सांगळे, श्रीमती अनिता गायकवाड, श्रीमती परविन सय्यद सहभागी झाले होते. तसेच समन्वयक श्रीमती विद्या पानसरे प्रशिक्षण सहसमन्वयक श्रीमती समीक्षा जाधव, संगीत घरदाळे, सोमनाथ गावित, सुलभक सौ.भारती वादळ कविता गहाणहुले, संध्या निकम काळूराम जाधव, राजश्री कांबळे, संदीप ऐनपुरे, राहुल जाधव, अनंता पवार, कल्पना बेलदार कल्पना सुपेकर उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या कालावधीत नवी मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी श्रीमती अरुणा यादव व अधिव्याख्याते डॉ. प्रभा खरटमोल यांनी प्राथमिक प्रशिक्षण केंद्र कोपरखैरणे व माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशिक्षण केंद्र वाशी या दोन्ही प्रशिक्षण वर्गास भेटी देऊन मार्गदर्शन केले.