दिवाळीमध्ये पॉड टॅक्सीचे भूमीपुजन -ना. सरनाईक

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरणपुरक पॉड टॅक्सी (उन्नत कार) प्रकल्पाचे भूमीपुजन येत्या दिवाळी सणात करण्याचा मानस असून २ वर्षात सदर प्रकल्प नागरिकांसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

ना. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरासाठी घोषित झालेला पॉड टॅक्सी प्रकल्प गुजरात मधील बडोदा येथे सुरु होणाऱ्या प्रकल्पानंतर महाराष्ट्रातील सदर दुसरा पॉड टॅक्सी प्रकल्प ठरणार आहे. यासाठी १ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च असून तो पीपीपी तत्वावर राबवला जाणार आहे. तर महापालिका कारशेडसाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन देणार आहे. किमान १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांवरच प्रकल्प उभारला जाईल, त्यात १६ पॉड टॅक्सी स्थानके मेट्रो स्थानकांना जोडले जातील. अवघ्या २ मिनिटात ती उपलब्ध असेल आणि २ किलोमीटरसाठी ३० रुपये तिकीट दर असेल. सदर प्रकल्पाचे भूमीपुजन डिसेंबर २०२५ अखेरीस होण्याची शक्यता आहे. प्रारंभिक टप्प्यात प्रकल्पाची सुरुवात जे. पी. इन्फ्रा परिसर, प्रभाग क्र.१२, १३, १८ येथील रुंद रस्त्यांवरुन होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन