तरुणाचा ‘डेंग्यूू' मृत्यू; मनसे आक्रमक
कल्याण : कल्याणमध्ये डेंग्युमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मनसे आक्रमक झाली असून ‘मनसेे'च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यालयात नारळ फोडून ठिय्या आंदोलन करीत ईडा पिडा टळू दे, ‘केडीएमसी'तील नागरिीकांचे आरोग्य सुधारु दे असे साकडे घालत घोषणा दिल्या. डेंग्युमुळे कल्याण पश्चिमेतील विलास म्हात्रे या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ ‘मनसे'ने निषेध आंदोलन केले. विलास म्हात्रे घरातील कमाविता तरुण होता, त्याचे कुटुंब निराधार झाले आहे. महापालिकेने त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत करावी. अन्यथा मनसे महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी ‘मनसे'च्या वतीने देण्यात आला.
‘केडीएमसी'च्या आरोग्याचा उडालेल्या बोजवाराच्या निषेधार्थ ‘मनसे'ने आक्रमक पवित्रा घेत महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोनल करीत घोषणा केली. तसेच डेंग्युचा बळी घेणाऱ्या आरोग्य अधिकारी यांना निलंबीत करण्याची मागणी केली. आरोग्याच्या गंभीर समस्ये बाबत कल्याण पश्चिम मधील ‘मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी महापालिका आयुक्त गोयल यांची भेट घेत सदरची आरोग्य समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देत ठोस उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले होते.
११ जुलै रोजी सकाळी उपचारादरम्यान विलास म्हात्रे यांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने महापालिकेच्या आरोग्याचा विभागाच्या उडालेल्या बोजवाऱ्याच्या निषेध करण्यासाठी ‘मनसे'चे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस आणि कल्याण शहराध्यक्ष प्रकाश भोईर, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विनोद केणे, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, सचिन पोपलाईटकर, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा उर्मिला तांबे, महिला शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई, माजी नगरसेविका लक्ष्मी बोरकर, कपिल पवार, गणेश लांडगे, संदीप पंडीत आदिंसह इतर अन्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढत संतप्त मनसे सैनिकांनी ठिय्या आंदोलन केले.
बेतुरकर पाडा आणि आसपासच्या परिसरात साथीच्या आजाराची लागण झाली असल्याने सुमारे १०० ते १५० रुग्ण खाजगी आणि महापालिका रुग्णालयात उपचार करीत असल्याची माहिती ‘मनसे'चे शहराध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली. गेल्या ३ दशकाहून अधिक कालावधीच्या महापालिकेचे २५०० कोटी हून अधिक रुपयांचे बजेट असताना महापालिका आरोग्य विभागाकडे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारावर रक्त तपासणीसाठी यंत्रणा नसल्याने या आजाराच्या रक्त तपासणीसाठी मुंबई, ठाणे शहरातील रुग्णालयात जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला.