‘खारघर दारुमुक्त'साठी २ दिवशीय साखळी उपोषण सुरु
खारघर : खारघर शहर ‘दारुमुक्त' करण्यासाठी ‘संघर्ष समिती' तर्फे गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे पत्रव्यवहार सुरु आहे. तसेच नुकतेच ‘संघर्ष समिती' तर्फे एक दिवशीय उपोषण करण्यात आले होते.
दरम्यान, ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन'चे औचित्य साधून ३१ मे ते १ जून २०२५ दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खारघर सेक्टर-२० मधील शिल्प चौक शेजारील मोकळ्या जागेत ‘संघर्ष समिती' तर्फे दोन दिवशीय ‘साखळी उपोषण' केले जात आहे. या आंदोलनात खारघर मधील नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी, महिला, युवक मंडळ प्रतिनिधी सक्रिय सहभागी झाले आहेत. या आंदोलनात खारघर मधील नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समिती तर्फे करण्यात आले आहे.