नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
ठाणेकर शौर्या अंबुरे आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत चमकली
ठाणे : ठाणे मधील तरुण खेळाडू शौर्या अंबुरे हिने बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत १०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक जिंकून भारतीय तिरंगा फडकावला आहे. स्पर्धेतील यशानंतयर मायदेशी परतल्यावर ठाणे शहरामध्ये शौर्या अंबुरे हिचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शौर्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचा सत्कार केला. शौर्या अंबरे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांची कन्या आहे.
ना. एकनाथ शिंदे यांनी शौर्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करीत तिचे पालक पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि रुपाली अंबुरे यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. शौर्या हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत १३.७३ सेकंदांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवला. तिच्या उल्लेखनीय कामगिरीने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे.
माध्यमांशी बोलताना शौर्या हिने तिचा आनंद व्यक्त करताना म्हटले की, माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि पदक जिंकणे खूप छान वाटते. भारताला अभिमान वाटावा अशी संधी मिळाल्याबद्दल मी खरोखर आभारी आहे. प्रशिक्षण आणि तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक अजित कुलकर्णी देखील या सत्कार समारंभास उपस्थित होते.