राम गणेश गडकरी यांची बदनामी, सीकेपी समाज आक्रमक

ठाणे : भारताचे भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभूराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज'तर्फे ठाणे शहरात तीव्र निदर्शने करुन ‘राष्ट्रवादी'चे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर निषेध केला. अर्धवट माहितीवर राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी आ. अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फासत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता.

राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानांमुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद ११ मार्च रोजी ठाण्यात उमटले. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शने करीत अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करुन आमदार मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

या आंदोलनात ‘अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती'चे अध्यक्ष समीर गुप्ते, जेष्ठ पत्रकार तुषार राजे, रामानंद सुळे, अतुल फणसे, गिरीश राजे, विकास देशमुख, जयदीप कोरडे, राजीव प्रधान, विनय चौबळ, शिरीष गडकरी, दीपक फणसे, नागेश कुळकर्णी, यशवंत रणदिवे, चंद्रशेखर देशपांडे, किशोर राजे, नितीन वैद्य, प्रकाश दिघे, तेजस राजे, राधिका गुप्ते, योगिनी चौबळ, पुजा सुळे यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू टक्केवारी साठी; ‘मनसे'चा आरोप