एक शहर, एक ॲप ‘पनवेल कनेक्ट' ॲप

पनवेल : पनवेल महापालिका तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना सेवा देण्यामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच दृष्टीकोनातून ईज ऑफ डुइंग लिव्हिंग या संकल्पनेला पुढे नेत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त कैलास गावडे, स्वरूप खारगे यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेने ‘पनवेल कनेक्ट' असे मोबाईल ॲप तयार केले आहे. यामध्ये विविध सोयी-सुविधांसह चॅटबोटचा वापर करुन नागरिकांना २४े७ सहाय्य उपलब्ध असणार आहे. यासाठी महापालिकेने मोबाईल क्रमांक ८९६०९१६०९१ जाहिर केला आहे.

‘पनवेल कनेक्ट' ॲप नागरिक आणिमहापालिका यांच्यातील संवादाची दरी मिटवत एक डिजीटल ब्रिज म्हणून कार्य करणार आहे. ‘पनवेल कनेक्ट' ॲप नागरिकांनी डाऊनलोड केल्यास नागरिकांना घरबसल्या सेवा मिळवणे, प्रमाणपत्रे, परवानग्या मिळवणे, तक्रार निवारण करणे, शासकीय उपक्रमांची माहिती मिळवणे, असे सर्व या एकाच ॲपवर शक्य होणार आहे.

सदर ॲप केवळ मोबाईल ॲप नाही, तर नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण केलेले एक प्रभावी व्यासपीठ आहे. ॲप पनवेल शहराच्या डिजीटल परिवर्तनाचे आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने उचललेले एक भक्कम पाऊल आहे.

‘पनवेल कनेक्ट' ॲप महापालिकेच्या लोकाभिमुख उपक्रमांची माहिती वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचवली जाऊन नागरिकांच्या सहभागाने शहर विकासात योगदान मिळण्यास हातभार लागून गरजेच्या वेळी नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी एक उत्तम  व्यासपीठ म्हणून काम करेल.

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘पनवेल कनेक्ट' ॲपमध्ये SOS आपत्कालिन सुविधा आणि निर्भया कक्षाशी संपर्क थेट जोडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या विविध महिला सक्षमीकरण योजना पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य करणार आहे.

शहरातील सर्व खाजगी कंपनींची नोंद घेऊन गरजू युवा आणि नागरिकांसाठी ‘पनवेल कनेक्ट'च्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात अनेक रोजगार निर्मिती संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शहरातील नागरिकांच्या सोशल मिडीया, पत्र, ई-मेल अशा विविध माध्यमांद्वारे येणाऱ्या समस्या आणि प्रश्न सदर ॲप मार्फत तक्रार निवारण प्रणालीचा वापर करुन सोडवल्या जाणार आहेत. यामध्ये किती तक्रारी आल्या, त्यावर कोणती कार्यवाही केली, किती प्रलंबित आहेत, या सर्व तक्रारी संबंधित अहवाल आणि डॅशबोर्ड आयुक्त यांच्या देखरेखे खाली असणार आहे.

‘पनवेल कनेक्ट' ॲपचा वापर करुन माहिती संकलन करणे, महाराष्ट्र लोकसेवा हमी हक्क कायदा-२०१५ अंतर्गत ऑनलाईन सेवांचा अर्ज करणे, महापालिका कर्मचारी यांच्यासाठी विविध सुविधा तसेच चालू घडामोडींवर वेबिनार, ब्लॉग्स उपलब्ध होणार आहेतच; पण यासोबतच ‘चॅटबोट'चा वापर करुन सदर ॲपद्वारे नागरिकांना २४/७ सहाय्य उपलब्ध असणार आहे. यासाठी महापालिकेने ८९६०९१६०९१ असा मोबाईल क्रमांक जाहिर केला आहे. ज्यामुळे नागरिकांचे प्रश्न आणि सेवा, विनंती यांचे त्वरित समाधान होण्यास मदत होणार आहे. सदर ॲपद्वारे ‘जीपीएस'च्या माध्यमातून स्थानिक नागरिक तसेच पर्यटक आणि स्थलांतरीत रहिवाशांसाठी पनवेल महापालिका हद्दीतील जवळची सरकारी कार्यालये, रुग्णालये, शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच रक्तपेढ्या, उद्याने सुलभतेने शोधता येणार आहेत.

‘पनवेल कनेक्ट' ॲपवरील महत्वाच्या सुविधाः
महिलांची सुरक्षा- एध्ए सुविधा आणि निर्भया कक्षाशी थेट संपर्क
महिला सक्षमीकरण- राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि उपलब्धता
रोजगार संधी- खाजगी कंपन्यांची माहिती आणि रोजगार उपलब्धतेसाठी प्लॅटफॉर्म
तक्रार निवारण- तक्रारी नोंदवणे, त्यावरची कारवाई आणि अहवालांचे डॅशबोर्डवर परीक्षण
संपूर्ण माहितीचा ॲक्सेस- जीपीएसद्वारे जवळची शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, उद्याने, स्वच्छतागृहे, रक्तपेढ्या शोधता येणार
२४े७ सहाय्य- चॅटबोटच्या माध्यमातून त्वरित सेवा आणि मार्गदर्शन
महत्वाच्या घडामोडी- वेबिनार, ब्लॉग्स, शासकीय घडामोडींची नियमित माहिती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘खारघर शहर दारुमुक्त'साठी २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने