पनवेल मध्ये ‘शिवसेना'ला हादरा

पनवेल : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेला विकास आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून  पनवेल तालुक्यातील वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीमधील पाली गावातील शिवसेना (उबाठा) ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेळके यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपा प्रवेश कार्यक्रम पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात झाला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल पूर्व मंडल भाजपा अध्यक्ष भूपेंद्र पाटील, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष अमित जाधव, चाहुशेठ म्हात्रे, गुरुनाथ भोईर, प्रविण म्हात्रे, भाजपा तालुका चिटणीस यतिन पाटील, सतीश शेळके, सतीश मालुसरे, अरुण जळे, महेंद्र भोईर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांची सेवा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन ठेवून काम केले, तर आपली ताकद अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन  आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नव्याने भाजपा प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व नवागत कार्यकर्त्यांचे पक्षाच्या शालीने स्वागत केले.यावेळी नयना शेळके, हरेश शेळके, स्वाती शेळके, महेश शेळके, चित्रा शेळके, सुभाष शेळके, भरत भोईर, रेखा भोईर, बारक्या शेळके, हनुमान शेळके, नितीन शेळके, भगवान शेळके, मच्छिंद्र शेळके, शाम शेळके, राम शेळके, जानवी शेळके, अजय शेळके, गुलाब शेळके, वैशाली शेळके, स्वस्तिका शेळके, वैजंती शेळके, संतोष शेळके, प्रशांत भोईर, बारकी शेळके, कुणाल शेळके, इंद्राबाई शेळके, निलम भोईर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे