सानपाडा येथील अरुप्रीत टायगर्स टीमने द चॅम्पियन्स ऑफ इन्शुरन्स शिल्ड पटकावली
नवी मुंबई : अरुप्रीत टायगर्स एलएलपीचा कर्णधार सिद्धेश गावंडे आणि पार्टनर पूर्वा अरुण केंडे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याकडून २६ मार्च रोजी क्रॉस मैदानावर आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण समारंभात चॅम्पियनशिप ट्रॉफी स्वीकारली. याप्रसंगी सचिव अभय हडप, संयुक्त सचिव दीपक पाटील, कोषाध्यक्ष अरमान मलिक, एपेक्स कौन्सिल सदस्य उन्मेष खानविलकर, सुरेंद्र हरमलकर, नदीम मेमन, विघ्नेश कदम आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजनद ओरिएंटेड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी जितेंद्र इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.