आयुक्त अनमोल सागर यांच्या ‘खेलो लातूर' उपक्रमाचा गौरव
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका आयुक्त यांनी लातूर जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना खेलो लातूर असा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला होता. या उपक्रमांतर्गत मनरेगा मधून शाळांमध्ये क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या २६ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान-स्पर्धा २०२४-२५ करिता राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर केले आहेत. यामध्ये ‘लातूर जिल्हा परिषद'च्या खेलो लातूर या उपक्रमास सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम या शिर्षकाखाली तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले आहे.
दरम्यान, ‘लातूर जिल्हा परिषद'च्या धर्तीवर भिवंडी शहरात देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी व्यक्त केला आहे.