डोंगरावरील वन्यजीवांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या तरुणांचा सत्कार

खारघर : खारघर डोंगरावर लागलेला वणवा विझवून वन्यजीवांची सुरक्षा तसेच डोंगरावर अडकलेल्या तरुणाची सुटका करणाऱ्या तरुणांचे ‘सिडको'चे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी सत्कार केल्यामुळे पर्यावरण प्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत.  

पनवेल महापालिका अग्निशमन दल आणि सिडको अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. नवीन पनवेल येथून खारघर दरम्यान काढण्यात आलेल्या अग्निशमन रॅलीचा समारोप खारघर येथील अग्निशमन केंद्रात पार पडला. दरम्यान, खारघर डोंगरावर दिवाळी नंतर अज्ञात व्यक्ती कडून वणवा लावला जातो. अनेक वेळा खारघरचे अग्निशमन जवान शर्तीचे प्रयत्न करुन वणवा आटोक्यात आटोक्यात आणतात. मात्र, डोंगर माथ्यावर तसेच डोंगरावर वणव्याची माहिती मिळताच डोंगरावर लावण्यात येणाऱ्या वणव्यामुळे वन्यजीवांची होणारी हानी रोखण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे तसेच काही दिवसापूर्वी डोंगरावर अडकलेल्या पर्यटकांची पोलिसांच्या मदतीने सुटका करणारे कातकरी  पाड्यातील  प्रकाश कातकरी, सुनील कातकरी, ओवे कॅम्प मधील नितीन तिवारी, नितीन आडे, खारघर डोंगरावर वणवा विझवणारे नितीन अड्डे यांचा सत्कार ‘सिडको'चे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी केला.

याप्रसंगी अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके, सौरभ पाटील, पर्यावरण प्रेमी ज्योती नाडकर्णी उपस्थित होते. यावेळी नाडकर्णी यांनी डोंगरावरील वणवा अथवा अचानक काही प्रसंग ओढविल्यास त्यातून सुटका करण्यासाठी तरुणांना अग्निशमन विभागाकडून योग्य प्रशिक्षण देण्याची विनंती केली. यावेळी राणे यांनी देखील चांगली बाब असून प्रयत्न केला जाईल असे सांगत वणवा विझविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या तरुणांनी अग्निशमन विभागाला सहकार्य करावे, असे सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१७ दिवसांत ९४३ मेट्रिक टन आंबा परदेशात निर्यात