पनवेल रेल्वे स्थानकावर एनसीबीची मोठी कारवाई; ३५ कोटींचा अंमली पदार्थ जप्त

पनवेल: एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) बंगळुरूच्या पथकाने पनवेल रेल्वे स्थानकावर केलेल्या धडक कारवाईत एका नायजेरियन महिलेचा अंमली पदार्थांसह अटक केली आहे. एतुमुदोन डोरिस (Etumudon Doris) उर्फ N E Abena असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून तब्बल २ किलो कोकेन आणि १.५ किलो एमडी (मेथॅम्फेटामाइन) असा तब्बल ३५ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

एनसीबी बंगळुरूने गत 16 जुलै रोजी बंगळुरू मध्ये कारवाईत केली होती. या कारवाईत केलेल्या तपासामध्ये आरोपीच्या घरातून  पासपोर्ट आणि नोट्स सापडले होते. या नोट्सच्या आधारे  Etumudon Doris उर्फ N E Abena नावाची महिला दिल्ली-एर्नाकुलम एक्सप्रेस (Train No. 12618) मधून प्रवास करत असल्याचे तसेच  तिच्याकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. सदर महिला A-2 कोचमधील बर्थ क्रमांक 27 वर प्रवास करत होती. आणि सदर महिला 18 जुलैच्या पहाटे पनवेल स्थानकावर येणार होती. 

त्यानुसार 18 जुलैच्या पहाटे एनसीबी बंगळुरू टीमने पनवेल रेल्वे पोलीस (RPF) आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पनवेल स्टेशनवर सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची झडती घेतली असता, तिच्या ताब्यात तब्बल २ किलो कोकेन आणि १.५ किलो एमडी (मेथॅम्फेटामाइन) असा एकूण अंदाजे ३५ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ सापडले. 

एनसीबी बंगळुरूच्या पथकाने महिला आरोपी Etumudon Doris हिला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या महिलेचा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून. त्यानुसार एनसीबी बंगळुरूच्या अधिकाऱ्याकडून तपास करण्यात येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक लाचखोरी प्रकरणात अटकेत