‘डोंबिवली'च्या शिरपेचात मानाचा तुरा
डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला ‘द्रोणाचार्य पुरस्कार' आणि ‘शिवछत्रपती पुरस्कार' डोंबिवलीकर असलेल्या ‘भोईर जिमखाना'चे संस्थापक पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही नितीन पाखले, आदर्श अनिल भोईर यांना जाहीर झाले. त्यामुळे तो माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे. शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना ‘भाजपा'चे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
रविंद्र चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन ‘द्रोणाचार्य पुरस्कार'ने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिक मधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार' जाहीर झाला याबद्दल या दोन्ही युवा खेळाडुंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला.
सदर सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. भोईर जिमखाना जेव्हा सुरु झाला, तेव्हापासून आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते. त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आल्यावर खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे, अशी भावना चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यवत केली.
डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार' जाहीर झाला आहे. तसेच त्यांचे गुरु पवन भोईर यांना ‘द्रोणाचार्य पुरस्कार' जाहीर झाला आहे.
पुण्यात उद्या १८ एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात सदर सोहळा संपन्न होणार असून राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. भोईर, पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील सदर अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले.