महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
विद्यार्थी मृत्यू प्रकरण
‘शिवसेना'तर्फे महापालिकेला इशारा
नवी मुंबई : शालेय सहलीदरम्यान इमॅजिका पार्क येथे झालेल्या घणसोली मधील १३ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्युच्या चौकशी कालावधीमध्ये शिक्षण उपआयुक्त, शिक्षणाधिकारी तसेच जबाबदार अधिकारी यांचे तात्पुरते निलंबन करण्यात यावे. चौकशी कालमर्यादेत करण्यात यावी. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा ‘शिवसेना उबाठा'तर्फे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
२५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खालापूर येथील इमॅजिका पार्कन येथे सहलीसाठी नेण्यात आले होते. यावेळी घणसोली येथील नमुमंपा शाळा क्र.७६ (हिंदी माध्यम) मधील विद्यार्थी आयुष धर्मेंद्र सिंग (१३) याचा मृत्यू झाला आहे. आयुष सिंग यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कालमर्यादेत करावी. या चौकशीदरम्यान महापालिका शिक्षण उपायुवत आणि शिक्षणाधिकिारी तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांचे तातपुरते निलंबन करावे, अशी मागणी करणारे निवेदन ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना दिले आहे. तसेच सदर मागणीची योग्य दखल न घेतल्यास महापालिका विरोधात आंदोलन छेडू, असा इशाराही ‘शिवसेना'तर्फे देण्यात आला आहे.
दरम्यान, ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळात ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, बेलापूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू, उपशहरप्रमुख समीर बागवान, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले, विभाग प्रमुख मिलिंद भोईर, विभाग प्रमुख बाबू तळेकर, विभाग प्रमुख सिध्दराम शीलवंत, बेलापूर विधानसभा युवा अधिकारी निखील मांडवे, उपविभाग अधिकारी संकेत मोरे, आदि पदाधिकारी सहभागी होते.