खांदेरी-उंदेरी किल्ला साकारला

कल्याण : ‘स्वराज्य समूह'च्या वतीने श्री विवेकानंद सोसायटी, सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व याठिकाणी जलदुर्ग प्रकारातील खांदेरी उंदेरी किल्ले साकारण्यात आले आहेत.

खांदेरी-उंदेरी किल्ले मुंबईजवळ असलेली दोन बेटे आहेत. खांदेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७९ मध्ये बांधला, तर उंदेरी किल्ला सिद्दींनी बांधला होता. सदर दोन्ही किल्ले मराठा आरमाराच्या सागरी टेहळणीसाठी महत्त्वाचे होते. दोन्ही किल्ले अलिकडेच ' मराठा लष्करी लँडस्केप्स' या अंतर्गत ‘युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत.

संस्कृती आणि परंपरांनी समृध्द अशा डोंबिवली शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ल्यांची परंपरा पाहायला मिळत आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्व येथील श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेतील स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने २७ बाय १८ फुट लांब खांदेरी-उंदेरी किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली. विशेष म्हणजे खांदेरी-उंदेरी या किल्ल्यांचा नुकताच ‘युनेस्को'ने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा; तुर्भेकरांचा जीव धोक्यात