महापालिका कडून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिला क्रमांक पटकाविला, सदरचे अभूतपूर्व यश सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेमुळे प्राप्त झाल्याने महापालिका प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान केला. भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह येथे झालेल्या सदर सोहळ्याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, प्रियांका राजपूत, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, कविता बोरकर, शहर अभियंता दीपक खांबीत, माजी नगरसेवक, सेवाभावी संस्थांचे पदधिकारी, आदि उपस्थित होते.

मिरा-भाईंदर शहराने केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५'मध्ये ३ ते १० लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. स्वच्छता स्पर्धेत मिळालेला सदरचा केवळ पुरस्कार नव्हे, तर संपूर्ण महापालिकेच्या प्रयत्नांचे, समर्पणाचे आणि सेवाभावाचे कौतुक आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच महिला आणि पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकुशलतेसाठी आणि कामाप्रती निष्ठेसाठी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत आहे, असे आयुवत राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले.

तसेच मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार सर्व मिरा-भाईंदरकर नागरिकांना समर्पित केला असल्याच्या भावना व्यक्त करत आयुवत शर्मा म्हणाले, सदर स्वच्छतेचा शेवट नाही. आपल्याला अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मिळालेला पहिला क्रमांक असाच टिकण्यासाठी आणखी मेहनत करणे आवश्यक आहे. शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन आयुक्त शर्मा यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा उपक्रम