अटल सेतू ते दिघोडे फाटा रस्त्यावर खड्डे

उरण : अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक, पर्यटक, विद्यार्थी, रुग्णांना त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत आणि लवकरात लवकर सदर रस्त्याचे रुंदीकरण करुन काँक्रीटीकरण करावे या मागणीसाठी दिघोडे गावातील संतप्त नागरिकांनी २५ जुलै रोजी दिघोडे फाट्यावरील चिखलात रुतलेल्या खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनात सरपंच किर्तीनिधी ठाकूर, महिला, प्रवाशी नागरीक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी जवळपास दिड तास चिखलातील खड्ड्यात बसून आंदोलन छेडल्याने रस्त्यावर मुंबई आणि कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती. या आंदोलनाची दखल ‘पीडब्ल्यूडी'चे उरण विभाग उपअभियंता नरेश पवार, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिघोडे गांवचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांना सदर रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित केल्याचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी सांगितले. तसेच सदर आंदोलनात उत्स्फुर्तपणे सहभागी झालेल्या दिघोडे ग्रामस्थ, प्रवाशी नागरिकांचे, महिलांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी सदर रस्त्याचे काम करणाऱ्या मेसर्स पी. पी. खारपाटील कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

सदर आंदोलनात ‘दिघोडे'चे माजी सरपंच अविनाश पाटील, वर्षकेतू हासूराम ठाकूर, उपसरपंच संदेश दयानंद पाटील, काँग्रेस नेते रामनाथ पंडीत, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संकीता संदिप जोशी, ॲड. निग्रेस पाटील, सुरेश हरिभाऊ पाटील, रमेश कोळी, अनंत नाखवा, मंदार पाटील, वरुण पाटील, अलंकार ठाकूर, गोकुळदास माळी, सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाटील, रोहिदास ठाकूर, अनिल काशिनाथ पाटील, शक्ती कोळी, नरहरी कोळी, श्रावण अंबा घरत, प्रल्हाद कासकर, दयानंद काशिनाथ पाटील, नवनाथ पांडुरंग ढवळे, संदीप गजानन जोशी, अलंकार वसंत पाटील, माजी उपसरपंच आरती शक्ती कोळी, ग्रामपंचायत सदस्य अलंकार मनोहर कोळी, रेखा नरहरी कोळी, कैलास अंबाजी म्हात्रे, अभिजित वसंत पाटील, अपेक्षा सतिष पाटील, अपेक्षा राकेश कासकर, महेश म्हात्रे, सचिन कासकर, नरहरी कोळी, रुतुराज पाटील तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यंदा बाप्पा शाडुचा उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद