दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सांत्वन
नवी मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने आणि नवीन पनवेल येथील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा आणि अतिरेक्यांविरोधात प्रचंड संतापाची भावना पसरली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवली आणि पनवेल येथील शोकाकुल कुटुंबीयांची त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मंत्री नाईक म्हणाले, "देशाच्या नेतृत्वाने आता ठाम भूमिका घेतली आहे. जे पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की त्यांनी देश सोडावा. तसेच जे भारतीय नागरिक कामानिमित्त पाकिस्तानात आहेत त्यांनीही लवकरात लवकर भारतात परत यावे. आपली एअर फोर्स, मिलिटरी, आणि नेव्ही सतर्क आहेत. या हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही."
त्यांनी सांगितले, "ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची मोठी हानी आहे. या कुटुंबीयांवर ओढवलेलं हे दुःख फार मोठं आहे. ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.