भाईंदरच्या ४ मुलींची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी निवड
भाईंदर : भाईंदर येथील बालयोगी कबड्डी ॲकॅडमी राई संघाच्या ४ मुलींची पुण्याच्या बालेवाडी येथे १४ ते १८ जून रोजी होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
‘भारतीय हौशी कबड्डी महासंघ'ला संलग्न राज्य केंद्रशासित प्रदेशांना १८ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा बालेवाडी पुणे येथे १४ ते १८जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. यात भाईंदर येथील बालयोगी कबड्डी ॲकॅडमी राईच्या भार्गवी म्हात्रे, मनस्वी पाठारे, संस्कृती पाटील, कुमकुम सिंग यांची मुंबई उपनगर संघात निवड करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे फायर अधिकारी सदानंद पाटील २०१८ पासून मुली आणि मुलांना प्रशिक्षण देत आहेत.
बालयोगी कबड्डी ॲकॅडमी मध्ये ७० मुली आणि मुलांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते.