पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी ‘शिवसेना'ची आग्रही मागणी
नवी मुंबई : नवी मुंबईतील पोलीस वसाहतींची दयनीय आणि धोकादायक अवस्था लक्षात घेता त्यांचा तातडीने पुनर्विकास करावा, अशी आग्रही मागणी ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकर पक्ष'च्या शिष्टमंडळाने पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांच्याकडे केली आहे.
शहरातील बेलापूर आणि वाशी परिसरातील पोलीस वसाहतींमध्ये पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रहावे लागत आहे. या वसाहतींमध्ये पाण्याची गळती, जुनी पडझड झालेली बांधकामे, सुरक्षिततेच्या दृष्टीने अपुऱ्या सुविधा, आदि समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित आणि सुसज्ज निवास मिळणे आता अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुर्भे एमआयडीसी आणि रबाले एमआयडीसी या वसाहती तर पोलिसांना राहण्याच्या सुध्दा क्षमतेच्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते वि्ील मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिका आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त तसेच ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन सादर केले. बेलापूर, वाशी, तुर्भे एमआयडीसी आणि रबाले एमआयडीसी येथील पोलीस वसाहतींमध्ये स्ट्रवचरल ऑडीट आणि इंफ्रास्ट्रक्चरल असेसमेंट करुन म्हाडा, एसआरए किंवा सिडको यांच्या माध्यमातून तातडीने पुनर्विकास करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली.
याप्रसंगी शिष्टमंडळात शिवसेना उपनेते वि्ील मोरे, नवी मुंबई संपर्कप्रमुख एम. के. मढवी, ऐरोली जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, बेलापूर जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी, संतोष घोसाळकर, सुमित्र कडू, संदीप पाटील, शहरप्रमुख महेश कोटीवाले, माजी नगरसेवक विशाल ससाणे, माजी परिवहन सदस्य तथा उपशहरप्रमुख समीर बागवान, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने पोलीस वसाहतींची प्रत्यक्ष पाहणी करुन परिस्थितीची गंभीरता अनुभवल्यानंतर सदरचा विषय हाती घेतला आहे. पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन सदर मुद्दा तातडीने मार्गी लावण्यासाठी ‘शिवसेना'ने निर्धार केला आहे. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितता, सन्मानजनक जीवनाच्या दृष्टीने त्यांना आधुनिक आणि सुसज्ज निवासस्थान मिळावे, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ‘शिवसेना'ची आग्रही भूमिका आहे.
- विठ्ठल मोरे, उपनेते-शिवसेना.