कॉरिडॉरच्या शासकीय जागेत अतिक्रमण त्वरित हटवा

खारघर : पुणे-मुंबई कॉरिडॉरच्या बाजुला शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. अतिक्रमण अधिकृत असल्याबाबतचे परवानगी पत्र, जागेची आणि इतर कागदपत्रे असल्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ शिबीर कार्यालय पुणे येथील कार्यालयात ३ दिवसाच्या आत सादर करावे. सदरचे अतिक्रमण ५ दिवसात काढून जागा मोकळी करण्याची नोटीस प्राप्त झाल्यामुळे रस्त्याचा कडेला व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे.

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र.४ महामार्ग वरील तळोजा गांव पनवेल-मुंब्रा मार्गावर आहे. तळोजा गांव, पापडीचा पाडा तसेच खुटारी आदि गावातील रस्त्याचा कडेला ग्रामस्थ वडिलोपार्जित काळापासून विविध व्यवसाय करीत आहेत. कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ'कडून ३ दिवसात जागा अधिकृत असल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. तसेच ३ दिवसात पुरावे सादर न केल्यास ‘महामंडळ'कडून कुठलीही पूर्व सूचना न देता संबंधित अतिक्रमण काढले जाईल. शिवाय अतिक्रमण निष्कासित करताना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास  महामंडळ जबाबदार राहणार नाही, अशा प्रकारची नोटीस पाठविल्यामुळे ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे तळोजा ग्रामस्थ आणि  ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष'चे पदाधिकारी फारुक पटेल यांची या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून त्यांना सदर विषयाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

‘महाराष्ट्र राज्य रास्ते विकास महामंडळ'कडून प्राप्त झालेल्या नोटीस संदर्भात रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुकानदार छोटी दुकाने टाकून अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. सदर समस्या  संदर्भात विशेष म्हणजे तत्कालीन सार्वजनिक बाांंधकम मंत्री नवाब मलिक यांच्या काळात तत्कालीन मंत्री विजयसिह मोहिते पाटील यांच्या दालनात दोन वेळा बैठक झाली. यावेळी नुकसान टाळण्यासाठी तळोजा गांव येथे उड्डाणपुल उभारण्यात यावे. १९५६ च्या सिटी सर्वेक्षणानुसार बांधकाम नुकसान आणि पुनर्वसनाचे लाभ देण्यात यावे या विषयी बैठक झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने ग्रामस्थांचे कोणतेही नुकसान करु नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
-फारुक पटेल, ग्रामस्थ, तळोजा गाव. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आपत्ती निवारणासाठी ‘नमुंमपा'चे आपत्कालीन प्रतिसाद दल सज्ज