भूतान येथे रंगणार आगरी अस्मिता साहित्य संमेलन

नवी मुंबई : ‘अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था'चे तिसरे आंतरराष्ट्रीय आगरी अस्मिता साहित्य संमेलन येत्या ११ एप्रिल रोजी भूतान येथे संपन्न होणार आहे. या ‘साहित्य संमेलन'च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, सिने संगीतकार अमृत पाटील-नेरुळकर यांची निवड झाली आहे. तर साहित्यिक, कथा-पट कथाकार, दिग्दर्शक गजआनन म्हात्रे यांची कार्याध्यक्ष तर ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता वाजेकर या उद्‌घाटक असणार आहेत.

भूतानची राजधानी थिंपु येथे होत असलेल्या या एक दिवसीय ‘साहित्य संमेलन'मध्येृ आगरी बोली भाषेवर परिसंवाद, साहित्यिक चर्चा, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि संगीतमय कवितेचा जागर असे अनेक कार्यक्रम होणार असल्याचे ‘अखिल भारतीय साहित्य संस्था'चे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक कैलास पिंगळे यांनी कळविले आहे. या ‘साहित्य संमेलन'चे स्वागताध्यक्ष  म्हणून कैलास पिंगळे स्वतः जबाबदारी पार पाडणार आहेत.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमृत पाटील-नेरुळकर यांची  ‘साहित्य संमेलन'च्या अध्यक्षपदी निवड झाल्याने विशेषतः येथील शिक्षक आणि साहित्यिक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अमृत पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘संमेलन'च्या अध्यक्षपदी निवड झालेले अमृत पाटील नवी मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असतात. त्यांची इतिहास नवी मुंबईचा, भजनयात्री, दय्राादिली, मेघमल्हार, पाखरांची शाळा, मी कोरोना वुहानकार बोलतोय अशी ६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच आकाशवाणी, दूरदर्शन, कॅसेट सिडी, चित्रपट, माहितीपटाच्या  माध्यमातून त्यांची ३०० हुन अधिक गीते ध्वनिमुद्रित झालेली आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अविरत या मराठी चित्रपटात गायक, गीतकार, संगीतकार अशा तिहेरी भूमिकाही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. स्वच्छता अभियान, अंधश्रध्दा निर्मुलन, पर्यावरण संरक्षण, बाल मजुरी, जल है तो कल है, आदि विषयांवर लिहिलेली आणिदिग्दर्शित केलेली त्यांची पथनाट्ये आज विद्यार्थी वर्गात विशेष लोकप्रिय आहेत.

अमृत पाटील यांचे भजन क्षेत्रात महत्वाचे योगदान असून आजतागायत त्यांनी १ हजारहून अधिक गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत. यात परदेशातील मॉरिशस, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ येथील कार्यक्रमांचाही समावेश आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तळोजा वसाहतीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ; सात वर्षीय बालकाला चावा