नवी मुंबई पोलीस दलात खांदेपालट
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील २८ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, बदली केलेल्या संबधित अधिकाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
मुंबईतून नुकतेच बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांची वाहतूक शाखेत, अजय कांबळे यांची खारघर पोलीस स्टेशनच्या प्रभारी पदी, पोलीस निरीक्षक सुनिल कदम यांची एनआरआय पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून, तर पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, अनिल पाटील आणि तानाजी भगत या तिघांची गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांची बीडीडीएस पथकामध्ये तसेच गुन्हे शाखेतील सचिन गवळी यांची रबाले पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे यांची कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहेत. तसेच सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांची तुर्भे पोलीस स्टेशन, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांची वाहतूक शाखेत, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांची वाहतूक शाखेत, तर वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांची महापालिका अतिक्रमण पथकात, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची गुन्हे शाखेत, पोलीस निरीक्षक संतोषकुमार काणे यांची सागरी सुरक्षा शाखेत, दिलीप गुजर यांची सिडको अतिक्रमण पथकात, पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांची खारघर पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सिडको अतिक्रमण पथकातील महिला पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांची गुन्हे शाखेत, महापालिका अतिक्रमण पथकातील पोलीस निरीक्षक जमील शेख यांची वाहतूक शाखेत, बीडीडीएस पथकातील पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांची वाहतूक शाखेत, विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांची सायबर पोलीस ठाण्यात, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अजय भोसले यांची वाहतूक शाखेत, वाहतूक शाखेतील राहुल काटवाणी यांची उरण पोलीस स्टेशनमध्ये, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.
त्याचप्राणे उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांची मोरा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून, आरबीआय सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक प्रमोद भोसले यांची वाहतूक शाखेत तर एनआरआय पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांची बदली कामोठे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.